esakal | PHOTOS : अंंबडमध्ये शेतकऱ्यांसाठी मनसेचे जलसमाधी आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील बारसवाडा येथील  गल्हाटी प्रकल्पात  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

PHOTOS : अंंबडमध्ये शेतकऱ्यांसाठी मनसेचे जलसमाधी आंदोलन

sakal_logo
By
बाबासाहेब गोंटे

बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील बारसवाडा येथील गल्हाटी प्रकल्पात सोमवारी (ता.13) सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना खरीप पिकांची व फळबागांची वादळ, वारे, अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी. यासाठी शासन व प्रशासन यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले. मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना अंबडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यामार्फत गत चार दिवसांपूर्वी गुरूवार (ता.9) मागण्यांचे लेखी निवेदन देऊन चार दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर सोमवारी (ता13) जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने दिला होता.

त्याप्रमाणे सोमवारी सकाळपासुनच मनसेचे शेकडो कार्यकर्ते अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी प्रकल्पात एकत्र येऊन जलसमाधी आंदोलनात सहभागी झाले. अंबड व घनसावंगी या तालुक्यात गत आठवड्यापासून पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे. यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेली पिके त्यांच्या डोळ्यादेखत भुईसपाट झाली.

पंचनामा करण्यासाठी जमिनीत पिकं तर दूरच पण माती शिल्लक राहिली नाही. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांची व फळबागांची हेक्टरी 50,000 रुपयांची मागणी मनसेच्या वतीने गांधीगीरी आंदोलन करत नुकसान भरपाई देण्याची जोरदार मागणी  करण्यात आली.

यावेळी गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कवळशे, सुखापुरी मंडळाचे मंडळाधिकारी दिवाकर जोगलादेवीकर, तलाठी एस.सोरमारे यांनी पोलिस फौजफाट्यासह जावून आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. जलसमाधी आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बळीराम खटके, बाळासाहेब उढाण, नंदकिशोर उबाळे, पंडीत बरडे, नाहेद पटवा, अशोक आटोळे, विष्णु पुंड, फारुख पठाण, खिजमतअली, महेश चोथे, हकीम शेख, चंद्रशेखर दोरखे, भागवत बडे, रावसाहेब हरिचन्द्रे, भाऊसाहेब चाबुकस्वार, संजय शिंदे, संतोष बिबे, शफीफ कुरेशी, सुनील बनकर, नितीन रोकडे, विष्णु येडे, दत्ता जामकर, अरुण मोटकर, विष्णु दिवटे, विष्णु कोकणे, साजिद शेख, आकाश गावडे, परमेश्वर जाधव, भागवत खंडागळे, तुकाराम निलाखे, शंकर निलाखे, गणेश जाधव, बळीराम खरजूले, योगेश नागरे, योगेश राठोड, सोहेल पठाण आदी सहभागी झाले होते.

मनसेचे पदाधिकारी जलसमाधी आंदोलन करताना.

मनसेचे पदाधिकारी जलसमाधी आंदोलन करताना.

loading image
go to top