

Parbhani
esakal
जिंतूर: तालुक्यातील पिंपराळा गावातील अनेकांना अतिसार व पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार, सोमवारी (ता. १५) २०-२५ महिलांवर गावातील मंदिरासमोर उघड्यावर सलाइन लावून उपचार करण्यात आले. या उपचारांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला हालचाली कराव्या लागल्या. मंगळवारी (ता. १६) सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते.