
नांदेड - अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेणार्या भोकर मतदारसंघात राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. दहाव्या फेरी अखेर अशोक चव्हाण तब्बल पन्नास हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार व माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत.
नांदेड - अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेणार्या भोकर मतदारसंघात राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. दहाव्या फेरी अखेर अशोक चव्हाण तब्बल पन्नास हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार व माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत.
नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघ हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. ज्येष्ठ नेेते (कै) शंकरराव चव्हाण यांच्यापासून ते आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. आता या ठिकाणी पुन्हा अशोक चव्हाण या मतदारसंघात उभे असल्याने ही लढत राज्यभरात लक्षवेधी ठरली आहे. वंचित बहुजन आघाडीने नामदेव आईलवाड यांना उमेदवारी दिली असली तरी खरी लढत चव्हाण व गोरठेकर यांच्यात सुरु आहे. मतमोजणी गुरुवारी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून अशोकराव यांनी आघाडी घेतली आहे. बाराव्या फेरीअखेर अशोक चव्हाण यांनी तब्बल 50 हजाराची आघाडी घेतली आहे.
पार्श्वभूमी
पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यावेळी कॉँगेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाणांचा नांदेड मतदारसंघात पराभव झाला होता. भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांना चुरशीच्या लढतीत पराभूत केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक दिग्गजांना बाजूला सारून चिखलीकर यांंची चव्हाणांविरोधातील उमेदवार म्हणून
निवड केली व निवडूनही आणले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॉँग्रेसकडून राहूल गांधी या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडल्या होत्या. आपल्याच बालेकिल्ल्यात झालेल्या पराभवाने अशोक चव्हाण सावध झाले होत.त्यांनी त्यावेळेपासूनच भोकर या आपल्या पारंपरिक मतदारसंघात लक्ष घातले होते. त्या ठिकाणी त्यांच्या सुविद्य पत्नी अमिता चव्हाण या विद्यमान आमदार आहेत. मात्र त्यांच्या विरोधात नाराजी होती.
स्वतः अशोक चव्हाण हे उभे राहणार असल्याने व अशोक चव्हाणांना लोकसभेत धडाही शिकविला असल्याने सर्वसामान्य मतदारांची सहानुभूती चव्हाण यांनी मिळाली. त्यातच त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार गोरठेकर यांचा हा मतदारसंघ नव्हता.तसेच त्यांना भाजपमधील नेत्यांचाच पाठिंबा मिळाला नाही. केवळ चिखलीकर यांना एकट्याला त्यांची बाजू सांभाळावी लागली. त्यातच अशोक चव्हाण यांनी विद्यमान भाजपचे सरकार नांदेडला कसे टार्गेट करते आहे. तसेच उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी कसे पळवले जात आहे, हे स्थानिक मुद्दे मांडले. तसेच माझे काही चुकले असेल तर माफ करा, मी तुमची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असेन, अशी भावनिक सादही घातली. त्यांच्या या आवाहनाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. एकूणच अशोक चव्हाण यांनी सूक्ष्म असे नेटवर्क, त्यावर नियंत्रण मिळवत मोठ्या विजयाकडे वाटचाल केली आहे. तर भाजपला खासदार व राज्यातील सत्तेची कुमक असूनही उमेदवार चुकीचा निवडला गेल्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे.