फुलंब्री (जि. औरंगाबाद) : विधानसभा अध्यक्षांच्या आला जिवात जीव । Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

औरंगाबाद -  फुलंब्री विधानसभा मतदार संघातून सुरु असलेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे हरीभाऊ बागडे यांनी तीसऱ्या फेरी अखेर 4 हजार 138 मतांनी आघाडी घेतली आहे. 

तीसऱ्या फेरी अखेर काॅग्रेसचे डाॅ. कल्याण काळे यांना 11 हजार 609 मते तर भाजपचे हरीभाऊ बागडे यांना 15 हजार 757 मते मिळाली आहेत

औरंगाबाद -  फुलंब्री विधानसभा मतदार संघातून सुरु असलेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे हरीभाऊ बागडे यांनी तीसऱ्या फेरी अखेर 4 हजार 138 मतांनी आघाडी घेतली आहे. 

तीसऱ्या फेरी अखेर काॅग्रेसचे डाॅ. कल्याण काळे यांना 11 हजार 609 मते तर भाजपचे हरीभाऊ बागडे यांना 15 हजार 757 मते मिळाली आहेत

फुलंब्री विधानसभा मतदार संघातील गेल्या 19 वर्षाचा लेखाजोखा बघितला तर दहा वर्ष कॉंग्रेस व दहा वर्ष भाजपच्या ताब्यात मतदार संघ आला. 1999 ला औरंगाबाद पूर्व मतदार संघ होता, त्या पूर्वी भाजपचे हरिभाऊ बागडे हे कॉंग्रेस पक्षाच्या मताची विभागणी मुळे सतत निवडून येत होते. कॉंग्रेस पक्षाचे दोन नेते एकच वेळी बंडखोरी करून निवडणूक लढवीत असत त्यामुळे भाजपला याचा सरळ फायदा होत गेला. 1999 साली हरिभाऊ बागडे हे निवडून आल्या नंतर 2004 साली कॉंग्रेस पक्षातर्फे नवीन चेहरा म्हणून डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या वतीने बंडखोरी झाली नाही व मतदारांना बदल हवा होता म्हणून मतदारांनी डॉ. कल्याण काळे यांना विजयी केले. या काळात त्यांनी मतदाराचा विश्वास संपादन केला नंतर 2009 साली पुन्हा डॉ. कल्याण काळे यांना मतदारांनी संधी दिली. सलग दहा वर्ष हा मतदार संघ कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिला.

2014 मध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांची आघाडी झाली नाही, परिणामी मताची झालेली विभागणी तसेच मोदी यांची लाट या दोन कारणामुळे फुलंब्री मतदार संघ कॉंग्रेस पक्षाच्या हातून गेला येथे पुन्हा भाजपचे हरिभाऊ बागडे निवडून आले. फुलंब्री मतदार संघात एकूण 170 गावे असून गावातील मतदार सुमारे अडीच लाखाच्या आसपास आहे. तर शहरी भागातील दहा वार्डातील मतदान संख्या 76 हजार पेक्षा जास्त आहे. 2009 पासून शहरी भाग फुलंब्री मतदार संघात समावेश करण्यात आला तेव्हा पासून शहरतील मतदाराचा कल हा भाजपच्या बाजूने दिसून आला.

2009 व 2014 ह्या दोन्ही निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला मतदान भाजप पेक्षा कमी मिळालेले आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी चांगलीच मते मिळविली असे असले तरी डॉ. कल्याण काळे हे केवळ तीन हजार 611 मताने पराभूत झाले होते. गेल्या चार विधानसभा निवडणुका पासून कॉंग्रेस पक्षा कडून डॉ. कल्याण काळे तर भाजप कडून हरिभाऊ बागडे यांच्यातच परंपरागत लढत होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Fulambri Aurangabad trends Third phase