वसमत - महाराष्ट्रात सर्वात जास्त हळद उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या पुढाकारातून हळद उत्पादक महिला शेतकऱ्यांची सहकारी संस्था स्थापन होणार असून आता पर्यंत ३०० महिलांची नोंदणी झाली आहे. राज्यातील अशा प्रकारची पहिलीच सहकारी संस्था असून यातून हळदीचे ब्रंँडींग करून विदेशातही हळद निर्यात करण्याचे प्रयत्न आहेत.