Maharashtra Monsoon: मराठवाड्यातील ५८ प्रकल्पांत; ७५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा
Water Storage: मराठवाड्यातील ८३७ जलसाठा प्रकल्पांपैकी फक्त ५८ टक्के प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांत रिमझिम पावसाने थोडा दिलासा मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : यंदा मराठवाड्यात ऐन मे महिन्यात पावसाळ्यासारखा पाऊस पडला होता. दरम्यान पावसाळ्यात पाऊस पडेल की नाही, अशी भिती व्यक्त केली जात होती. सध्या कपाशी, सोयाबीनसारखी पिके पावसाअभावी माना टाकू लागली असल्याची चित्र आहे.