परळी वैजनाथ - बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त मोठी गर्दी झाली असून राज्य, परराज्यातील शिवभक्तांनी महाशिवरात्रीला दर्शनाचा लाभ घेतला. बम बम भोले, हरहर महादेव, वैद्यनाथ महाराज की जय या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी लाखों शिवभक्तांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
येथील वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह राज्य, परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले आहेत. शहरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मराठवाड्यातून, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातूनही शिवभक्त मोठ्या संख्येने एकदिवस अगोदर पासूनच वैद्यनाथाच्या दर्शनासाठी शहरात दाखल झाले आहेत.
बुधवारी (ता. २५) मध्यरात्री १२ पासूनच मंदिरात शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. पहाटे पासून मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढल्याचे दिसून आले. दरम्यान वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्री पर्वानिमित्त महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे असून महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी (ता. २५) रात्री १२ पासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. ते बुधवारघ (ता.२६) रात्री १२ पर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावर बेलफूलांची दुकाने लागली असून बाजारसमितीच्या जागेवर यात्रा भरली आहे.
या यात्रेत रहाट पाळणे, खेळणीची दुकाने, महिलांसाठी सौंदर्यप्रसादने दुकाने लागली आहेत. तसेच वैद्यनाथ मंदिर परिसरात विविध सामाजिक संघटनेच्या वतीने शिवभक्तांसाठी प्रसादाचे वाटप, फिल्टर पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
धनंजय मुंडे यांनी रात्री वैद्यनाथांचे दर्शन घेतले. दरम्यान धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने वैद्यनाथ मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व सुमारे २१ प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. या आकर्षक सजावटीमुळे वैद्यनाथ मंदिर व परिसर लखलखून निघाला.
तालुक्यातील शिवमंदिरात शिवभक्तांची गर्दी
महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशीतील शिवमंदिरात शिवभक्तांनी पहाटे पासूनच गर्दी केली होती. ज्यामध्ये बेलवाडी, सुर्वैश्वर नगरासह जिरेवाडी येथील श्री. सोमेश्वर, श्री. नागनाथ (नागापूर), श्री. पापदंडेश्वर (गाढे पिंपळगाव), तपोवन, धर्मापुरी आदि शिवमंदिरे भाविकांनी फुलून गेले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.