तुळजाभवानी मातेच्या मस्तकी रेखाटली महादेवाची पिंड 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या मस्तकी महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी रेखाटलेली महादेवाची पिंड. 

तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या मस्तकी महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी (ता. २१) महादेवाची पिंड रेखाटण्यात आली होती. तुळजाभवानी मातेच्या मस्तक दररोज अभिषेकानंतर गंध चोपण्यात येतो. तुळजाभवानी मातेच्या मस्तकावरील गंधावर महादेवाची पिंड काढण्यात आली तसेच टोपाच्या पाठीमागे विड्याच्या पानाची अर्ध चंद्राकृती माळही लावण्यात आली होती.

तुळजाभवानी मातेच्या मस्तकावर महादेवाची पिंड भाविकांना महाशिवरात्री निमित्त शुक्रवारी पाहण्यास मिळाली. तुळजाभवानी मातेच्या प्रत्यक्ष मूर्तीच्या कपाळावर महादेवाची कोरलेली पिंड आहे. तुळजा भवानी माता पार्वतीचा अवतार समजण्यात येतो. तुळजा भवानी मातेसमोरच भवानी शंकर असून, महाशिवरात्री निमित्त भवानी शंकरास दिवसभर अभिषेक चालू होते. दरम्यान तालुक्यातील सिंदफळ येथील मुदगलेश्वर मंदीरात भाविकांची दश॔नासाठी गर्दी झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahashivrata at Tuljavani Temple