

छत्रपती संभाजीनगर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी तीन शिवालये मराठवाड्यात असून, महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येलाच ती गजबजली आहेत. वेरूळ येथील घृष्णेश्वर, परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथ आणि औंढा नागनाथ येथील प्रभू नागनाथाच्या मंदिरांत बुधवारी (ता. २६) विविध कार्यक्रम होणार असून, लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरविण्याचे नियोजन यापूर्वीच झाले आहे. महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या यात्रा शिवभक्तांसाठी पर्वणी असतील.