Jamir Pathan
sakal
फुलंब्री - फुलंब्री नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक नगरपंचायत सभागृहात सोमवारी (ता. १२) पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले संख्याबळ सिद्ध करत काँग्रेसचे नगरसेवक जमीर पठाण यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे नगरपंचायतीत सत्ताधाऱ्यांचा वरचष्मा कायम राहिला आहे.