Mahavitaran : चौसष्ट हजार ग्राहकांनी भरले ऑनलाइन वीजबिल; घरबसल्या देयक भरण्याकडे कल , ३५ कोटी २३ लाख रुपयांची वसुली
Online Electricity Bill Payment : महावितरणच्या टेक्नोसेव्ही ग्राहकांची संख्या वाढत आहे, ज्यामुळे ऑनलाइन वीजबिल भरण्याचे प्रमाण वाढले आहे आणि महावितरणची थकबाकी कमी होत आहे.
जालना : महावितरणच्या टेक्नोसेव्ही ग्राहकांची संख्या वाढत असून, दर महिन्याला हजारो ग्राहक ऑनलाइन वीजबिल भरण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे ग्राहकांचा वीजबिल भरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचत असून महावितरणची थकबाकी कमी होत आहे.