
छत्रपती संभाजीनगर : चालू बिलासह थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणकडून करण्यात येत आहे. मराठवाड्यात वीज जोडणी घेतल्यापासून तब्बल ५३ हजार ७७४ वीज ग्राहकांनी एकदाही पैसे भरले नाहीत. त्यांच्याकडे ७० कोटी ३१ लाख २८ हजार रुपये थकबाकी आहेत.