

माहूर: टाकळी परिसरात फुलोऱ्यावर बहरलेले उन्हाळी हंगामातील तीळ व ज्वारीचे पिक.शिवारात डोलत असलेल्या पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरण कंपनीच्या रात्री वीस पुरवठा निर्णयामुळे रात्रपाळी करावी लागत आहे.(छायाचित्र: साजिद खान,माहूर)
sakal
माहूर : माहूर तालुक्यातील वानोळा,सिंदखेड,वाई बाजार व महसूल मंडळात महावितरण कडून कृषी पंपांना थ्री-फेज वीज पुरवठा रात्रीला एक वाजेपासून सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान केला जात असल्याने शेतकरी रात्रपाळीच्या गंभीर संकटात सापडला आहे,परिसरात हिंस्र वन्य प्राणी बिबटे,अस्वल,रान डुक्कर आदींचा मुक्त वावर आहे,त्यांच्या दहशतीखाली उन्हाळी पिके वाचवताना पुरता मेटाकुटीला आला आहे.दिवसभर उन्हात शेतीची कामे करून राबलेल्या शेतकऱ्याला रात्रीच्या काळोखात पुन्हा शेतात पाणी देण्यासाठी रात्रपाळीला जावे लागत आहे.