PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

PESA Document Scrutiny : माहूरमध्ये जिल्हा परिषदेच्या पेसा अंतर्गत निवड झालेल्या ४७ पैकी २३ उमेदवारांना त्यांच्या कागदपत्रांतील त्रुटी पूर्तता करण्यासाठी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये केवळ तीन दिवसांची मुदत मिळाल्याने, त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
Diwali Nightmare 23 PESA Candidates Face Job Loss Due to Short Document Submission Deadline Amidst Holidays

Diwali Nightmare 23 PESA Candidates Face Job Loss Due to Short Document Submission Deadline Amidst Holidays

Sakal

Updated on

माहूर : पेसा अंतर्गत सन २०२३ मध्ये जिल्हा परिषदेत निवड झालेल्या ४७ पैकी २३ उमेदवारांचे भवितव्य सध्या संकटात सापडले आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट कार्यालयाने अचानक नोटीस काढत ४७ पैकी तब्बल २३ उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे सांगत त्यांना फक्त तीन दिवसांत पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र,ही मुदत दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये येत असल्याने सन १९५० चे जुने अभिलेख काढण्यासाठी आवश्यक असलेले कार्यालये बंद असणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे सादर करणे अशक्यप्राय ठरत आहे.परिणामी, या उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com