

माहूर: वाई बाजार येथे बी.एल.ओ.कडून मतदार यादी पुननिरीक्षणाचे काम सुरू आहेत. त्याला मतदारांमधूनही चांगला प्रतिसाद मिळतोय.
Sakal
माहूर : (जिल्हा नांदेड) सध्या माहूर तालुक्याच्या सर्व गावांच्या एकूण ९७ मतदार यादी भागाच्या मतदार यादीमधील मतदारांचे सन २००२ मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या अंतिम मतदार यादी भागातील मतदारांशी मॅपिंग करण्याचे काम बी.एल.ओ. यांच्या मार्फत सुरु आहे. माहूर तालुक्यात आजरोजी मतदार यादीमध्ये ८३ हजार दोन शे ९५ मतदारांचा समावेश असून, त्यापैकी ६७ हजार एक शे ९७ मतदारांची मॅपिंगचे काम पुर्ण झालेले असून,अजूनही १६ हजार ९८ मतदारांचे मॅपिंग करणे बाकी राहीलेले असून निवडणूक आयोग राबवित असलेली ही मोहीम ३१ मार्च पर्यंत असल्याकारणाने उद्यापर्यंत मॅपिंग न केलेल्या मतदारांनी अंतिम मतदार यादी भागातील मतदारांशी मॅपिंग करण्याचे आवाहन माहूर चे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले आहे.