

Beed News
esakal
माजलगाव: मराठवाड्यातील महत्त्वाच्या माजलगाव धरणाच्या भिंतीवर उभारलेला भव्य जलविद्युत प्रकल्प आज स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. ज्या प्रकल्पातून संपूर्ण तालुक्याला आणि शहराला ऊर्जेचा प्रकाश मिळणार होता, तो प्रकल्प आज प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अक्षरशः धूळखात पडला आहे.