

Beed News
esakal
माजलगाव: एखाद्या स्वप्नाचं आयुष्य किती असावं? माजलगावकरांसाठी हे स्वप्न गेली १५ वर्षं डोळ्यासमोर उभं आहे, पण ते सत्यात उतरताना दिसत नाहीये. गोदावरीचं ओसंडून वाहणारं अतिरिक्त पाणी आपल्या धरणात येईल, धरणाची पातळी वाढेल आणि पिढ्यानपिढ्यांचा दुष्काळ कायमचा मिटेल, या आशेवर तालुक्यातील हजारो डोळे पाणावले आहेत.
लोणी सावंगी उपसा जलसिंचन योजना ही केवळ एक तांत्रिक योजना नसून, माजलगावच्या दुष्काळमुक्तीची ती लाइफलाइन आहे. मात्र, दुर्दैवाने मागील दीड दशकापासून या योजनेला प्रशासकीय दिरंगाई आणि कासवगती कामाचं ग्रहण लागलं आहे.