
माजलगाव, (जिल्हा बीड) : मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे माजलगाव धरणात पाण्याची मोठी आवक सुरु झाली. सायंकाळी ९२ टक्केपर्यंत भरलेल्या माजलगाव धरणाचे रात्री १० वाजता तीन दरवाजे उघडण्यात आले. पाच हजार ९१९ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.