

Beed Gas Supply
esakal
माजलगाव: इंधन टंचाईच्या चर्चा सुरू असताना, माजलगाव शहर व तालुक्यात मात्र घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सध्या तरी पूर्णपणे सुरळीत आहे. तालुक्यातील सुमारे ५० हजार गॅस कनेक्शन धारकांना मागणीप्रमाणे वेळेवर सिलिंडर उपलब्ध होत असून, सध्या कोणत्याही प्रकारची ओरड नसल्याचे चित्र समोर आले आहे.