Santosh Deshmukh Family Help : मस्साजोगच्या देशमुख कुटुंबीयांच्या मदतीला धावले माजलगावकर
Majalgaon News : माजलगावकरांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली देशमुख कुटुंबासाठी ४४ लाख २२ हजार ४८३ रुपयांची मदत उचलली. ही रक्कम शुक्रवारी देशमुख कुटुंबीयांकडे सुपूर्द केली असून, दोषींना शिक्षेची ग्वाही दिली.
माजलगाव : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली. या हत्येने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. यानंतर सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी याठिकाणी भेटी दिल्या, मदतीसाठी हात पुढे केला.