Pankaja Munde
Pankaja Mundesakal

Pankaja Munde : माजलगाव मतदारसंघातील गटबाजी लवकरच संपेल!

राज्यामध्ये पक्षांतर्गत गटबाजी आहे त्याचे काय? माजलगाव मतदारसंघातील असणारी पक्षांतर्गत गटबाजी मी आक्रमण म्हटल्यास सगळे एकत्र येतील.
Summary

राज्यामध्ये पक्षांतर्गत गटबाजी आहे त्याचे काय? माजलगाव मतदारसंघातील असणारी पक्षांतर्गत गटबाजी मी आक्रमण म्हटल्यास सगळे एकत्र येतील.

माजलगाव - राज्यामध्ये पक्षांतर्गत गटबाजी आहे त्याचे काय? माजलगाव मतदारसंघातील असणारी पक्षांतर्गत गटबाजी मी आक्रमण म्हटल्यास सगळे एकत्र येतील व कार्यकर्त्यांना मात्र बळ देणार असल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगीतले.

शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराच्या उद्घाटनानंतर बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे यांच्या निवासस्थांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वागताचे आयोजन शुक्रवारी ता. 3 करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार आर. टी. देशमुख, भाजपा नेते रमेश आडसकर, छत्रपती कारखाना उपाध्यक्ष मोहन जगताप, माजी नगराध्यक्ष अशोक होके पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

वास्तविक पाहता मतदारसंघामध्ये होणा-या राजकीय कार्यक्रमास गटांचे वेगवेगळे कार्यक्रम होतांना दिसुन येतात. भाजपा वेगवेगळ्या गटांमध्ये विखुरलेली असल्यामुळे कार्यकर्त्यांना देखिल कोणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे याबाबत नेहमीच संभ्रम राहिलेला आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखिल सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या विजयावर देखिल दावे, प्रतिदावे करण्यात आले होते. आज याच गटबाजीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करतांना माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्यामधल्या गटबाजीचे काय ?

माजलगाव मतदारसंघातील तसेच बीड जिल्ह्यातील पक्षांतर्गत असलेले मतभेद मी आक्रमण म्हणल्यास ते लवकरच संपुष्टात आलेले दिसतील व आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. दरम्यान यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी, राजेभाउ मुंडे, किशनराव नाईकनवरे, भाजपा तालुकाध्यक्ष अरूण राउत, शहराध्यक्ष अॅड. माणिक दळवे, दत्ता महाजन, विनायक रत्नपारखी, डॉ. प्रशांत पाटील, रूपाली कचरे यांची उपस्थिती होती.

Pankaja Munde
Raj Thackeray: "कधीच विसरणार नाही!" इन्स्टावरची लाडकी सरफरे वहिनी पोहचली शिवतीर्थावर

माजी मंत्री पंकजा मुंडे या माजलगाव येथे आरोग्य शिबीराच्या उद्घाटनासाठी आल्या असता माजी नगराध्यक्ष अशोक होके पाटील यांच्या निवासस्थांनी माजी आमदार राधकृष्ण होके पाटील यांनी स्वागत केले. तर भाजपा नेते रमेश आडसकर यांच्या निवासस्थांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रमेश आडसकर यांनी स्वागत केले. छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप यांच्या भाजपा कार्यालयात देखिल स्वागत करण्यात आले. वेगवेगळ्या गटांनी स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.

बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी सर्वच गटांना एकत्रित करत सर्वांच्या वतीने एकत्रित येउन माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार करत स्वागत केले. असे जरी असले तरी पक्षातील ही गटबाजी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये संपेल का ? हा कार्यकर्त्यांसमोर प्रश्नच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com