Kalamb Crime : कळंबमध्ये जुगारविरोधी मोठी कारवाई; ५९ जणांवर गुन्हे, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत पोलीस प्रशासनाने मोठी आणि धडक कारवाई करत कळंब शहरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
Major Anti-Gambling Crackdown in Kalamb 59 Arrested

Major Anti-Gambling Crackdown in Kalamb 59 Arrested

sakal

Updated on

कळंब - धाराशिव जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत पोलीस प्रशासनाने मोठी आणि धडक कारवाई करत कळंब शहरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत तब्बल ५९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जुगारविरोधातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जात असून ही कारवाई पोलिसांनी बुधवार (ता. 24) रात्री केली. याप्रकरणी कळंब पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com