Ganja Seized in umarga
sakal
उमरगा, (जि. धाराशिव) - उमरगा पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (ता. नऊ) कर्नाटक सीमेवरील हिप्परगाराववाडी शिवारात दोन स्वतंत्र ठिकाणी छापा टाकून मोठी कारवाई केली. या संयुक्त कारवाईत बेकायदेशीरपणे लागवड केलेला सुमारे ६४२ किलो वजनाचा आणि ३ कोटी २४ लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.