
देवगाव रंगारी : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथक व देवगाव रंगारी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत देवगाव रंगारी (ता कन्नड )येथे गांजाची अवैध विक्री करणाऱ्या एका इसमाला गुरुवारी (ता २२)अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे पाच किलो सहाशे पन्नास ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारातील किंमत अंदाजे एक लाख ६९हजार पाचशे रुपये इतकी आहे.