
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुणे येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालय यांच्यात १८ जुलैला सामंजस्य करार झाला. शेती संशोधन व तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना, शेती उत्पादन क्षमतेत वाढ घडवणारा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.