बीड - मागच्या आठवडाभरापासून विविध कारणाम्यांनी चर्चेत आलेल्या आणि भाजप आमदार सुरेश धस यांना टिकेचा धनी बनवणारा सतीश भोसले उर्फ खोक्या याला मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी त्याच्या हद्दपारीसाठी महसूल विभागाला दिलेल्या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे मान्यता दिली आहे. त्यामुळे आता खोक्याची जिल्ह्यातून हद्दपारी निश्चित झाली आहे.
एका व्यक्तीला बॅटने मारहाण, वाहनांत नोटांचे बंडलची ठेवाठेव, तसेच सोफ्यावर बसून नोटांचे बंडल जुळवण्यासह शाळेत भाषण देताना पाय मोडण्याची भाषा करणारे सतीश भोसले उर्फ खोक्याचे व्हिडीओ समोर आले. भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा पदाधिकारी असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक असल्याने धसांवरही चोहेबाजूने टिका झाली.
अलिकडे बॅटने मारहाणीच्या घटनेवरुन खुद्द पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून दिलीप ढाकणे यांचे दात पाडल्यावरुनही त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. वनविभागाच्या छाप्यात त्याच्या घरी शिकारीचे साहित्य आणि गांजा आढळल्याने हा देखील गुन्हा नोंद झाला. त्याच्या अटकेसाठी शिरुर बंद करुन मोर्चाही काढण्यात आला.
सहा दिवसांपासून फरार असलेला सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या बीड पोलिसांनी उत्तरप्रदेश पोलिसांच्या मदतीने प्रयागराज येथून मुसक्या आवळल्या. त्याला दोन दिवसांत जिल्ह्यात आणून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यापुवीच त्याला आणखी एक धक्का बसला आहे.
त्याच्यावर शिरुर कासार, पाटोदा, अंमळनेर पोलिस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे नोंद होते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खोक्या भोसलेवर हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याची बीड जिल्ह्यातून हद्दपारी करण्यात आली आहे. याबाबचे पत्र शिरुर कासार पोलिसांना देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.