बीड - जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या जिल्हा पोलिस दलात शनिवारी (ता. ३१) मोठे फेरबदल करण्यात आले. जिल्हा पोलिस दलातील तीन पोलिस निरीक्षक, नऊ सहाय्यक पोलिस निरीक्षक व पाच पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या..तसेच, बाहेर जिल्ह्यातून आलेल्या दोन निरीक्षकांनाही पोलिस ठाण्यांची जबाबदारी देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांची नेमणूकही शनिवारी पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी केली. शिवाजी बंटेवाड यांना ही जबाबदारी देण्यात आली..शिवाजी बंटेवाड हे बीड ग्रामीण पेालिस ठाण्यात कार्यरत होते. ११ महिन्यांपूर्वी परळीहून उस्मान शेख यांची स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी विनंती बदलीची मागणी केली होती. त्यांची सरत्या आठवड्यात लातूरला बदली झाली..पोलिस निरीक्षक संवर्गामध्ये शिवाजी नगर ठाण्याचे मारुती खेडकर यांची बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात तर त्यांच्या जागी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून आलेले किशोरसिंग पवार यांना जबाबदारी देण्यात आली. अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्याचे विनोद घोळवे यांची सायबर पोलिस ठाण्यात बदली झाली. तर, त्यांच्या जागी संभाजीनगरहून आलेले शरद जोगदंड यांना नेमणूक देण्यात आली..अनैतिक मानवी प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्होगाडे यांना वडवणी पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली. याच संवर्गातील गणेश धोक्रट यांची शिरुर कासारहून जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली.राजेंद्र घुगे यांची अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यातून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात तर गेवराईहून संतोष जंजाळ यांची पाटोदा पोलिस ठाण्यात आणि आर्थिक गुन्हे शाखेतील रत्नाकर घोळवे यांची एटीबीला बदली करण्यात आली. आरसीपीला असलेले महादेव ढाकणे यांना दिंद्रूड तर अंबाजोगाई शहरला असलेले मनोज निलंगेकर यांना तलवाडा आणि परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यातील प्रविण जाधव यांना शिरुर कासार पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली..परळी ग्रामीण पोलिस ठाण्यातील अनमोल केदार यांची पोलिस अधीक्षकांचे वाचक म्हणून बदली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील भारत बर्डे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून युसूफवडगाव पोलिस ठाण्यात तर शफिक सय्यद यांची पोलिस अधीक्षकांच्या वाचक शाखेतून बीड उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे वाचक पदावर बदली करण्यात आली..डिएसबीमधील दादासाहेब केदार यांना कायम ठेवले असून आनंद शिंदे यांची केजहून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अदिनाथ भडके यांची पाटोदाहून अंभोरा पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली.सेवाजेष्ठता, अधिकाऱ्यांचे कामांचे मुल्यांकन, गृहविभागाच्या विविध नियमांनुसार बदल्यांचे आदेश काढण्यात आले. क्षमता असलेल्यांना पोलिस ठाण्यांची जबाबदारी देण्यात आली.- नवनीत कॉंवत, पोलिस अधीक्षक बीड..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.