Gram Panchayat Election: तिळ गूळ घ्या मत आम्हालाच टाका; महिला उमेदवारांची प्रचारात नवी शक्कल

sankrant and election
sankrant and election

जळकोट (लातूर):  Makar Sankranti 2021 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी चांगलीच सुरु आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर मकर संक्रांतीचा सण आल्याने मतं मागण्यासाठी महिला उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे. त्यानिमित्ताने कंरड्यात हळदी कुंकांची पुढी टाकून हातात तिळगूळ घेऊन घरात जाऊन ताई ,आजी, काळी गुळाचा गोडवा ओठावर येऊ द्या, संक्रातीला तिळ गुळ खाताना आमची आठवण राहू द्या असे म्हणत अनेक महिला उमेदवारांचा आशिर्वाद घेत प्रचार सुरु असल्याचे दिसत आहे.

तालुक्यातील 26 ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात साठ टक्के महिला आपले भवितव्य अजामवत आहे. येत्या 15 तारखेला ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर मकर संक्रांत सण आला आहे. त्याचे औचित्य साधत महिला उमेदवारांना प्रचार यंञणेचे दिवस संपले असले तरी या सणानिमित्ताने महिला उमेदवारांना प्रचार व मतदान मागण्यासाठी एक चांगला दिवस आला आहे.

शहरातील दुकानांत गुरुवारी दिवसभर संक्रातीचे साहित्य खरेदीसाठी तोबा गर्दी केली आहे. आज (14) सकाळपासून महिला उमेदवारांनी उभे टाकलेल्या आपल्या वार्डातील प्रत्येक महिलांना घरात जाऊन ताई, आजी,आ क्का म्हणत तिळ गुळ घ्या तोंड गोड करा मागले विसरू जा म्हणत मला मतदान करा म्हणत पायावर डोके ठेऊन मतदान मागण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील किती महिला उमेदवारांना संक्रात सण किती गोड ठरणार हे 18 तारखेला मतमोजणीनंतर समजणार आहे. सध्या तरी तिळ गुळ घ्या गोड गोड बोला असं गोड आवाजात महिला उमेदवार महिला मतदारांना बोलताना दिसून येत आहेत.

अनेक गावात एकमेकांच्या विरुद्धात जवळील नात्यातील महिला निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महिला मतदारांना मतदान कुणाला करावे असा प्रश्न त्याच्यासमोर पडला आहे. संक्रात सणानिमित्त महिला उमेदवारांना तिळ गुळ देण्याच्या निमित्ताने प्रचार करण्यास मुभा असल्याने 14 रोजी सकाळपासून हातात हळदी कुंकाचा करड्या सोबत तिळ गुळ घेऊन आपल्या वार्डातील प्रतेक घरात जाऊन आशिर्वाद मागितला जात आहे. संक्रातीचा दिवस महिला उमेदवारासाठी एक आगळा वेगळा दिवस ठरणार आहे.

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत पुरुष उमेदवारांपेक्षा महिला उमेदवार जास्त आहेत. सरपंचपदाचे आरक्षण हे मतमोजणीनंतर असल्याने आरक्षण सुटल्यानंतर महिला उमेदवारांना पुरुष उमेदवारापेक्षा सरपंच पदावर बसण्यासाठी जास्त संधी असल्याने पुरुष पेक्षा महिला उमेदवारांकडून प्रचार जोरदार तयारी आतापर्यत दिसून आली आहे. उद्या सकाळी साडेसात पासून मतदानाला सुरुवात होणार आहे. संक्रात सणानिमित्त एक दिवस अगोदर तिळ गुळाच्या निमित्ताने घरोघरी जाऊन चर्चा करता येत असल्याने हा दिवस त्यांच्यासाठी सोन्याचा दिवस ठरणार आहे.

(edited by- pramod sarawale)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com