The Science Behind Makar Sankranti: Transition to Uttarayan
sakal
येरमाळा : मकर संक्रांती हा केवळ धार्मिक सण नसून तो खगोलशास्त्रीय आणि भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजेच सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे आपला प्रवास सुरू करतो. या आंतरिक्षातील बदलाचा थेट परिणाम पृथ्वीवरील ऋतू, तापमान, दिवस-रात्र कालावधी आणि वातावरणावर होतो.तसा मानवी आरोग्यावरही परिणाम होतो. त्यादृष्टीने काळजी घेणे गरजेचे आहे.