लॉकडाऊनमध्ये करा योगा आणि प्राणायाम

yoga.jpg
yoga.jpg

नांदेड : करोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात योगा अाणि प्राणायाम करा.  योगासन, प्राणायाम आणि ध्‍यानसाधनेने शरीराची प्रतिकारशक्‍ती व फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते, असे आवाहन योग शिक्षक डॉ. प्रविण शर्मा यांनी केले आहे.

करोना फुप्फुसाशी संबंधित आजार
करोना हा विषाणूजन्य आजार फुप्फुसाशी संबंधित आजार आहे. त्यामुळे प्रतिकार शक्‍ती व फुप्फुसाची कार्यक्षमता कमी असलेल्‍या लोकांना त्याचा प्रादुर्भाव लवकर होतो. त्‍याचा प्रभाव अधिक काळ राहिल्‍यास रुग्णाचा मृत्‍युही होऊ शकतो. परंतु नियमित योगासन व प्राणायाम केला तर शरीराची प्रतिकारशक्‍ती आणि फुप्फुसाची क्षमता वाढण्‍यास मदत होते. या सोबतच नियमित सूर्यनमस्काराने प्रतिकारशक्‍ती वाढते, सकारात्‍मक ऊर्जा निर्माण होते, तणाव कमी होतो, फुप्फुस, पोट आणि मेंदूची क्षमता वाढते. अष्‍टांग योगाने शारीरिक, मानसिक, आध्‍यात्मिक आणि सामाजिक आजार व समस्‍यांपासून स्‍वत:ला दूर ठेवता येते. मत्‍स्यासन, अर्धमत्‍स्‍यंद्रासन, शवासन, सेतू बंधासन, भुजंगासन, हलासन, धनुरासन, ताडासन, वृक्षासन, उत्‍कंटासन, त्रिकोणासन, गोमुखासन आणि मर्जरासन नियमित करण्‍याचा सल्ला त्यांनी दिला. भस्त्रिका, कपालभाती, भय्य प्राणायाम, नाडीशोधन, भ्रामरी, ओंकार, घश्यातील प्रार्दुभावासाठी उज्‍जयी प्राणायाम अतिशय उपयुक्‍त आहे. 

कपालभाती प्राणायम-
‘कपालभाती’ या संस्कृत शब्दाचा अर्थ – कपाल=कपाळ आणि भाती=ओजस्वी, प्रकाश. म्हणजेच बुद्धीला तेज आणणारे प्राणायामाचे तंत्र. हे तंत्र आपले शरीर व मन दोन्ही संतुलित ठेवण्यास मदत करते. या प्राणायामाच्या प्रकारात उच्छावासाद्वारे आपल्या शरीरातील ८० टक्के विषद्रव्ये (टॉक्सिन्स) बाहेर टाकली जातात. कपालभातीच्या नियमित सरावाने आपली बुद्धी तल्लख व तीक्ष्ण होते. या प्रकारामुळे शरीरातील आंतरिक अवयवांमध्ये उर्जा निर्माण होते. विशेषत:मधुमेहींना याचा अधिक फायदा होऊ शकतो. तसेच कपालभाती नियमित केल्याने चयापचय प्रक्रिया (मेटॅबॉलिझम) सुधारते सहाजिकच त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारल्याने चेहऱ्यावर तेज निर्माण होते.

हेही वाचलेच पाहिजे....

भस्रिका प्राणायाम-
भस्रिका प्राणायामात श्वास नाकावाटे आत घेऊन जलद गतीने बाहेर सोडला जातो. या प्रकारामुळे शरीरातील उर्जेची पातळी वाढते. या प्राणायमाचा फायदा असा की यामुळे शरीराला उर्जा मिळते तसेच नाक, घसा व सायनस मधील अडथळे दुर होतात. हा प्राणायामाचा प्रकार पोटविकार, अपचन, गॅसेस या त्रासांमध्येही लाभदायक ठरु शकतो. जलद गतीने केलेल्या श्वास-उच्छासामुळे पोटातील आतड्यांमधील हवेची पोकळी मोकळी होते.

शितली प्राणायाम-
शितली या  संस्कृत शब्दाचा अर्थ आहे थंड.शितली हा प्राणायामाचा प्रकार तुमच्या शरीराला थंडावा देतो.शितली प्राणायामात हवा तोंडावाटे आत घेतली जाते व नासिकांमार्फेत बाहेर सोडली जाते.जीभेवाटे श्वास आत घेतल्यामुळे शरीराला थंडावा मिळत त्यामुळे मध्यवर्ती मज्जासंस्था शिथिल होते.प्राणायामाच्या या प्रकारामुळे पोटशुळ,ताप,पित्तविकार तसेच चिडचिड कमी होऊ शकते.या प्रकाराच्या नित्य सरावाने उच्च रक्तदाब देखील नियंत्रित होतो.

नाडी शोधन प्राणायम- 
नाडी शोधन प्राणायामात डाव्या व उजव्या नासिकेने आलटुन पालटुन श्वास घेतल्याने डाव्या व उजव्या मेंदूच्या कार्यात समतोल राखणे शक्य होते. ज्याचा आपल्या व्यक्तिमत्वातील तर्कशुद्ध तसेच भावनिक बाजुंशी संबध आहे. हा प्राणायामातील एक असा प्रकार आहे ज्यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो व रक्ताभिसरण सुधारते. या प्राणायामुळे शरिरातील ऑक्सिजन व कार्बनडायऑक्सईडचे प्रमाण सुधारते. त्यामुळे अशुद्ध रक्ताचा निचरा होऊन शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. तसेच शरिरातील तापमानात समतोल राखण्यास मदत होते.

उज्जायी प्राणायाम-
या प्रकारात श्वास मंद गतीने घेतल्याने मन शांत होते. मंद श्वासामुळे शरिरातील लिम्बिक आणि पिच्युटरी (पिट्युटरी) प्रक्रिया कार्यक्षम होतात. ज्यामुळे चिंता, काळजी, ताणतणाव, नैराश्य या सारख्या समस्यांना सामोरे जाण्यास मदत होते. या व्यतिरिक्त डोकेदुखी,सायनस या सारख्या दुखण्यांवरही उज्जायी प्राणायाम फायदेशीर ठरते.हा प्रकार चिंता, काळजी दूर करण्यास व पचनसंस्था सुधारण्यास फायदेशीर ठरतो.

अनुलोम विलोम-
अनुलोम विलोम हा प्राणायामातील असा एक प्रकार आहे की ज्यामुळे मन शुद्ध होते, ताणतणावातून त्वरीत आराम मिळतो. या प्रकारामुळे अवयवांना संरक्षण मिळते व मज्जासंस्था बळकट होते. फुफ्फुसे निरोगी होतात व संपुर्ण शरीराला मुबलक ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे शरीराला आंतरिक थंडावा मिळतो. नियमितपणे केलेल्या या प्राणायामाच्या सरावाने मज्जासंस्थेला देखील आराम मिळतो. नक्की वाचा निरोगी स्वास्थ्यासाठी नियमित करा सूर्यनमस्कार !

भ्रामरी प्राणायाम-
भ्रामरी प्राणायामाचे नाव भारतातील काळ्या रंगाच्या भुंग्यावरुन दिले गेले आहे. कारण या प्रकारात श्वास बाहेर सोडताना भुंग्याप्रमाणे गुणगुण्याचा आवाज केला जातो. हा प्राणायाम उच्च रक्तदाब असणा-यांसाठी वरदान आहे.तसेच चिंता, काळजी त्वरीत दुर करतो व मनाला रिलॅक्स करतो. भ्रामरी प्राणायामाची मायग्रेन सारख्या डोकेदुखीत आपल्याला मदत होते. या प्रकाराच्या नियमित सरावामुळे रक्तदाब नियंत्रित होतो. यामुळे स्मरणशक्ती व एकाग्रता देखील वाढते. हे नक्की जाणुन घ्या मायग्रेनची डोकेदुखी कमी करणारे ‘भ्रमरी प्राणायम’ !

सुर्यभेदन प्राणायाम-
यामध्ये उजव्या नासिकेतून हवा फुफ्फुसात घेतली जाते व डाव्या नासिकेतून बाहेर सोडली जाते. या प्रकारामुळे संपुर्ण शारिरीक क्रिया सक्रीय व कार्यक्षम होण्यास मदत होते.रक्तातील ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे होणारे आजारही यामुळे बरे होतात. हा प्रकार नासिकांना स्वच्छ करतो आणि पोटातील जंतुचा नाश करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com