बैलाच्या धडकेत एकाचा मृत्यू

dead_bod
dead_bod
Updated on

विहामांडवा (औरंगाबाद) : विहामांडवा (ता. पैठण) येथे बैलाच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी (ता. 19) मृत्यू झाला.

मृताचे नाव साहेबराव निवृत्ती ब्रह्मराक्षस (वय 50) असे आहे. 9 सप्टेंबरला साहेबराव बैलपोळानिमित्त येथील मारुती मंदिर परिसरात पोळा पाहण्यास गेले होते. येथे अचानक उधळलेल्या बैलाचा जोराचा धक्का लागल्याने ते जमिनीवर कोसळले. डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना तात्काळ औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नऊ दिवसांच्या उपचारानंतर अखेर त्यांचा बुधवारी मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com