esakal | तुळजापुरात भरदिवसा बसस्थानकाजवळ तरुणाचा खून; शहरात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

tuljapur

तुळजापुरात भरदिवसा बसस्थानकाजवळ तरुणाचा खून; शहरात खळबळ

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (उस्मानाबाद): शहरात बसस्थानकाजवळ युवकाचा तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याची घटना गुरूवारी (ता.29) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत युवकाचे नाव शंकर दाजी गायकवाड (वय 25) राहणार काक्रंबाचा (ता. तुळजापूर) आहे. येथील जुने एसटी बसस्थानक ते लातूर रोड या ठिकाणी असणाऱ्या गोदामासमोरील रस्त्यानजीक सदर युवकावर तीक्ष्ण हत्याराने पोटावर गंभीर स्वरूपाचे वार करण्यात आले. (crime news in tuljapur)

जखमी झालेल्या युवकाला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी गंभीर जखमी झालेल्या शंकर गायकवाड याच्यावर उपचार करण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. तथापि उपचारास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. उपजिल्हा रुग्णालयात नागरीकांची मोठी गर्दी झाली होती.

हेही वाचा: उस्मानाबादेत पोस्ट म्युकरची दुर्मिळ शस्त्रक्रिया; जिल्हा रुग्णालयाच्या टीमला यश

पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद तसेच फौजदार चव्हाण यासह पोलिस कम॔चाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद बर्वे यांनी सदर युवकाच्या पोटावर गंभीर वार झाले होते असे सांगितले.

loading image
go to top