Jalna Crime: जालना जिल्ह्यात प्लॉटच्या वादातून अंगावर चारचाकी घालून खून; घनसावंगी परिसरात उघड्या रस्त्यावर मृत्यू
Crime News: जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे प्लॉटच्या वादातून चारचाकीने अंगावर गाडी घालून एका इसमाचा खून करण्यात आला. श्रीरंग पडोळकर यांचा जागेवरील हक्क वादग्रस्त ठरल्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
जालना : प्लॉटच्या वादातून अंगावर चारचाकी वाहन घालून एकास ठार मारल्याची घटना घनसावंगी (जि. जालना) येथील सूतगिरणी फाटा परिसरात शनिवारी (ता. दोन) दुपारी तीनच्या सुमारास घडली.