Life Imprisonment : जन्मदात्रीवर अत्याचार; नराधमास जन्मठेप, दंड
Jalna News : जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मदात्रीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कारावासाची शिक्षा होईल, असे न्यायालयाने सांगितले.
जालना : जन्मदात्रीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी सोमवारी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षाही सुनावली आहे.