उद्या एकट्या शिवसेनेचा की महायुतीचा जाहीरनामा? 

माधव सावरगावे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीऐवजी कर्जमुक्ती आणि पिकविम्याचा विषय असेल तर तो संयुक्त असणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

घनसावंगी : शिवसेनेचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती, विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक याबाबत जाहीरनाम्यात स्पष्टपणे देण्यात येणार असल्याचे सुचकपणे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आता हा जाहीरनामा संयुक्त असेल की एकट्या शिवसेनेचा हे उद्याच कळेल.

या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीऐवजी कर्जमुक्ती आणि पिकविम्याचा विषय असेल तर तो संयुक्त असणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या साडेचार वर्षात भाजप आणि शिवसेनेची शेतकरी, कर्जमाफी, पीकविम्याबाबत भूमिका ही भाजपविरोधी असल्यासारखी होती. याच मुद्द्यावरून निवडणुकीसाठी युती होण्यापूर्वी अनेक भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला होता. शिवाय पीक विम्यावरून आंदोलनही केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manifesto of shivsena will be release tomorrow