मांजरा धरण भरले, सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केज (जि.बीड) : तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण पुर्ण क्षमतेने मंगळवार रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भरले आहे.

मांजरा धरण भरले, सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

केज (जि.बीड) : तालुक्यातील (Keij) धनेगाव येथील मांजरा धरण (Manjara Dam) पूर्ण क्षमतेने (१०० टक्के) मंगळवारी (ता.२१) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भरले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी उजव्या कालव्यातून १.२७ प्रति सेघमी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती (Beed) अभियंता शाहुराज पाटील यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यासह शेजारच्या लातूर (Latur) व उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील सिंचन व पाणीपुरवठा योजनेसाठी वरदान ठरलेल्या मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के भरले आहे.

हेही वाचा: करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर;पाहा व्हिडिओ

त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या सिंचन व पाणीपुरवठा योजनेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. अत्यंत महत्त्वाचे असणारे मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने धरणातील पाणी साठ्यात वाढ होणार असल्याचे गृहीत धरून पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या उजव्या कालव्यातून १.२७ प्रति सेघमी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे अभियंता पाटील यांनी सांगितले आहे.

Web Title: Manjara Dam Full Irrigation And Driking Water Problem Solved In Keij Tahsil Of Beed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :manjara dam
go to top