

Manoj Jarange questions Ramdas Kadam over the audio recording
esakal
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या आरोपांनंतर पत्रकारांशी संवाद साधत या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले. संबंधित ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा दावा करणाऱ्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिले. ही क्लिप कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून तयार करण्यात आल्याचे सांगितले जात असेल, तर त्यामागील सत्य समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते रामदास कदम यांना या रेकॉर्डिंगची तारीख आणि वर्ष कसे माहिती झाले, असा सवाल करत जरांगे यांनी या प्रकरणात पडद्यामागे काही घडत असल्याचा संशय व्यक्त केला.