

Manoj Jarange Criticizes Vikhe Patil Over Maratha Reservation Says Gazetteer Based Kunbi Certificates Were Not Implemented
sakal
वडीगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी मंगळवारी मंत्री व मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली. ‘‘विखे पाटील पळपुटे असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐकून मराठा समाजाचे वाटोळे केले. त्यांनी गोड बोलून आमचे एक वर्ष वाया घालवले. हैदराबाद व सातारा गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे मराठा समाजाचे नुकसान झाले, ’’ असा आरोप त्यांनी केला.