Manoj Jarange: मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा कट? गेवराईतून दोन संशयित ताब्यात
Beed Police Custody: मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे यांना जीवे मारण्याच्या कटाचा आरोप; गेवराईतून दोन जण पोलिसांच्या ताब्यात. धमकी प्रकरणात पोलिस तपास सुरू, मनोज जरांगे यांनी रात्री उशिरा तक्रार दाखल केली.
जालना : मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन कट रचल्याप्रकरणी आंदोलक मनोज जरांगे यांनी बुधवारी(ता.पाच) मध्यरात्रीनंतर पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दिला होता.