Manoj Jarange : मनोज जरांगे यांना वीस तासांच्या उपचारानंतर सुटी
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना बीडमध्ये उपचार घेत असताना अचानक अशक्तपणा आणि रक्तदाब कमी झाला. २० तासांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांना सुटी देण्यात आली.
बीड : शिक्षक, डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्यातील भाषणादरम्यान अचानक अशक्तपणा व रक्तदाब कमी झाल्याने बीड येथे उपचार घेत असलेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना शनिवारी (ता. २९) सुटी देण्यात आली. २० तासांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली.