.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जालना : ‘‘मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आहे. सरकारमधील हे तिघेही जुनेच नव्याने आले आहेत. मराठा आरक्षणाचा दीड वर्षांपासूनचा प्रश्न त्यांना नवीन नाही. त्यामुळे पाच जानेवारीपर्यंत (२९ दिवस) आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, अन्यथा अंतरवाली सराटी येथे कोट्यवधी मराठा समाज सामूहिक उपोषणासाठी पुन्हा येईल, अशा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला.