Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा ताफा भांबेरी गावात, रात्रीतून मुंबईला निघणार; सरकार देखील आक्रमक!

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे व मराठा समाज बांधव हे आज (रविवार ता.25) रोजी उपमुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी अंतरवाली सराटी येथून निघाले आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilesakal

Manoj Jarange Patil:  मराठा आंदोलक मनोज जरांगे व मराठा समाज बांधव हे आज (रविवार ता.25) रोजी उपमुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी अंतरवाली सराटी येथून निघाले आहेत. मनोज जरांगे अंतरवाली सराटी - विहामांडवा रोडवरील भांबेरी ता.अंबड जालना येथे थांबले आहे. येथून ते रात्रीतून मुंबईला निघणार आहेत. मनोज जरांगे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्य सरकार मनोज जरांगे यांच्यावर नाराज आहे.

मनोज जरांगे यांनी समाज बांधव व मंहत शिवाजी महाराज यांच्या आग्रहाखातर पाणी घेतले आहे. येथे सोबत असलेल्या मराठा आंदोलकांना गावातील नागरीकांनी  जेवण दिले. तसेच गाड्या बोलावून रात्री मधून मनोज जरांगे हे मुंबईला रवाना होणार आहेत. जरांगे यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

जरांदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री छगन भुजबळ, सदार्वते यांना समोर केले. नगरमधील देखील एक नेता आहे. हे बदनामी करत असून कटकारस्थान आखत आहेत. भाजपमध्ये सर्व नेते वाईट नाहीत काही चांगले देखील आहेत. पण सर्व नेत्यांना विनंती आहे की आरक्षणाला विरोध करु नका. आमची सरकार सोबत लढाई आहे. पोलिसांनी आम्हाला अडवू नये, असे मनोज जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil: जरांगेंची भाषा राजकीय, त्यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या, मर्यादेत राहा; मुख्यमंत्री शिंदेंचा स्पष्ट भाषेत इशारा!

जरांगे हे अंतरवाली सराटी येथून नालेवाडी, भांबेरी, विहामांडवा, पैठण, गंगापुर, येवला, नाशिक, ठाणे या मार्गाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाणार आहेत.

सरकारचा इशारा- 

मनोज जरांगे पातळी सोडून बोलत आहे. सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, अशा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. आंदोलन करायला विरोध नाही पण कायदा व सुव्यवस्था बिघडवली तर कुणालाही सोडणार नाही, असे शिंदे म्हणाले. 

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil: "उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचे विषय..."; मनोज जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com