

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केलं आहे. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप करावेत, कोल्हापूर, सातार गॅझेट लागू करावं, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, रद्द झालेल्या वैध व्हॅलिडिटी बहाल कराव्यात, या मागण्यांसाठी हे उपोषण सुरु आहे.