

मराठा आरक्षणाबाबतच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटलांनी २९ ऑगस्टपासून उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे. गुरुवारी उपोषण सुटेल अशी शक्यता निर्माण झाली होती. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालं होतं. मात्र जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिले.