

maratha reservation
esakal
Manoj Jarange Patil Hyderabad Gazette: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा तापला आहे. मागच्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांचं अंतरवाली सराटी इथं उपोषण सुरु आहे. गुरुवारी सहाव्या दिवशी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड आंदोलनस्थळी दाखल झाले होते. त्यापूर्वी मराठा आरक्षण अभ्यासकांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत छत्रपती संभाजी नगर येथे बैठक पार पडली.