Manoj jarange Patil: उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास दिला नकार, म्हणाले 'माझी भूमिका...'

Manoj jarange Patil: मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळली आहे. मात्र, जरांगे यांनी उपचार घ्यायला नकार दिला आहे. जरांगेंचा बीपी खालावला आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.
manoj jarange patil
manoj jarange patilsakal

मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळली आहे. मात्र, जरांगे यांनी उपचार घ्यायला नकार दिला आहे. जरांगेंचा बीपी खालावला आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे. यामध्ये त्यांचा बीपी आणि शुगर तपासली. त्यामध्ये डॉक्टरांना बीपी खालावल्याचे दिसून आले. त्यांच्यावर उपचार घेण्यासाठी त्यांना सांगण्यात आले आहे. त्यावर जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही असं जरांगेंनी म्हटलं आहे.

आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, इकडे आमरण उपोषण सुरू आहे. सरकार तिकडे बैठका घेऊन मला लाडीगोडी लावण्याच्या प्रयत्न करत आहे. सरकार मुद्दामहून डाव खेळत आहे. त्यांना माया असते तर त्यांनी दखल घेतली असती. आरक्षणाबाबतची दखल घेतली नाही तर मराठे त्यांना चांगला कचका दाखवतील असंही जरांगे पुढे बोलताना म्हणालेत.

manoj jarange patil
Ajit Pawar: अजित पवारांनी शंका उपस्थित केलेला 'तो' आमदार कोण?, आतली गोष्ट सांगतोय बाहेर

उपचारांसंबधी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, डॉक्टरांनी सांगितलं मला उपचार घ्यावे लागतील. पण मी घेणार नाही, माझी भूमिका कायम आहे. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही असं जरांगेंनी म्हटलं आहे. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरु केलं आहे.

manoj jarange patil
Chandrakant Patil on Vinod Tawde: विनोद तावडेंना पक्षात मिळणार मोठी जबाबदारी? चंद्रकांत पाटलांनी केलं मोठं वक्तव्य

दरम्यान, लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आठ जूनपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला गावातील लोकांनीच विरोध केल्याचे समोर आलं होतं. ज्यानंतर त्यांनी दुसरीकडं उपोषण करण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी अंतरवालीमध्येच उपोषण करण्याचा निर्णय घेतला.

manoj jarange patil
Mumbai High Court: आता दफन करण्यासाठी मंगळावर जायचं का? मुंबई उच्च न्यायालयाने BMC ला केला सवाल, काय आहे प्रकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com