
महाराष्ट्रातील धाकटी पंढरी म्हणून ख्यातनाम असलेल्या श्रीक्षेत्र नारायण गडावर यंदाच्या विठ्ठल-रुक्मिणी आणि श्री संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज यांच्या महापूजेचा मान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आला आहे. गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी याबाबत घोषणा करत जरांगे यांना विशेष निमंत्रण दिले आहे. सकाळी १० वाजता मनोज जरांगे नारायण गडावर दाखल होणार असून, दुपारी १२:३० वाजता त्यांच्या हस्ते महापूजा संपन्न होईल. ही बातमी मराठा समाजासाठी अभिमानास्पद ठरली असून, राज्यभरात याबाबत उत्साहाचे वातावरण आहे.