Manoj Jarange Patil Supporters Block Dhanora Junction
sakal
- सुनिल पांढरे
पळशी - धानोरा फाटा (ता. सिल्लोड) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा बांधवांच्या वतीने गुरुवारी (ता. ३) सिल्लोड-कन्नड मुख्य मार्गावरील धानोरा फाटा येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करून करण्यात आलेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे सिल्लोड-कन्नड मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.