

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी (४ मार्च) हे फोटो समोर आल्यानंतर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी हॉस्पिटलमधून थेट मस्साजोग गाठले आणि हत्येच्या निषेधार्थ कठोर कारवाईची मागणी केली.