

Manoj Jarange Movement Gets Support In Sillod As Maratha Community Holds Road Blockade With Bullock Carts And Cattle
esakal
-सचिन चोबे
सिल्लोड : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड तालुक्यात मराठा समाज बांधवांच्या वतीने गुरुवार (ता.03) रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सिल्लोड - कन्नड राज्य महामार्गावरील धानोरा फाटा येथे मराठा समाज बांधवांनी बैलगाड्या, जनावरांसह एक तास रास्तारोको केला.